

मुंबईत कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला असून यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोस्टल रोडवर झालेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावर होणाऱ्या रेसिंगच्या प्रकारामुळे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघातात मृत्यू झालेले तरुण हे १७ ते २५ वर्षे वयाचे होते.