

Mumbai Coastal Road to Remain Closed for 5 Hours Tomorrow
esakal
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील आपत्कालीन यंत्रणांची चाचणी घेण्यासाठी उद्या शुक्रवार, १५ मे रोजी पहाटे १ ते ६ या वेळेत म्हणजे ५ तास रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ही चाचणी वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आज १४ मे रोजी उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी अशीच बंदी घालण्यात आली होती. उद्या (शुक्रवार) मात्र दक्षिण दिशेने जाणाऱ्या वाहनांना या बंदीचा परिणाम भोगावा लागणार आहे.