Mumbai : कल्याण रेल्वेच्या लोको शेडमध्ये कोब्रा नाग सर्प मित्राने रेस्क्यू करत नागाला दिले जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : कल्याण रेल्वेच्या लोको शेडमध्ये कोब्रा नाग सर्प मित्राने रेस्क्यू करत नागाला दिले जीवदान

कल्याण : कल्याण रेल्वे लोको शेडमध्ये दिवस रात्र इंजिन आणि डब्बे दुरुस्तीचे शेकडो कामगारांकडून काम सुरु असते. त्यातच रात्र पाळीत कामगार काम करत असताना भक्ष्याच्या शोधात कोब्रा नाग लोको शेडमध्ये शिरला होता.

त्यावेळी एका कामगाराला भिंतीच्या पाईपवर कोब्रा नाग फणा काढून बसल्याचे दिसला. या कोब्रा नागाला पाहून त्याने लोकोशेड मध्ये कोब्रा नाग घुसल्याची ओरड करताच सर्व कामगारांनी काही काळ काम बंद करून या नागाच्या भीतीने पळ काढला.

तर कमलाकर सूर्यवंशी नावाच्या कामगाराने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून लोको शेडमध्ये कोब्रा नाग शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागाला शिताफीने पकडून पिशिवत बंद केले . कोब्रा पकडल्याचे पाहून कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा कोब्रा नाग साडे तीन फूट लांबीचा असून अत्यंत विषारी इंडियन कोब्रा जातीचा आहे. दरम्यान या नागाला कल्याण वन अधिकाऱ्यांची परवानगीने आज सकाळी निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहेत.