अकरावी प्रवेशाची अखेरची यादी लागली; अजूनही ऍडमिशन झाली नसेल तर कशी घ्याल ऍडमिशन, जाणून घ्या

तेजस वाघमारे
Saturday, 30 January 2021

रिक्त जागांचा अहवाल 31 जानेवारीला अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

मुंबई, ता. 30 : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शुक्रवारी (29 जानेवारी) पुर्ण झाली. यानंतरही काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसून प्रवेशासाठी विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर प्रवेशाच्या अखेरच्या फेरीनंतर सुमारे 82 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. जागावाटप झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. 

मोठी बातमी : शिवसेना घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, भेटीचं कारण आहे अत्यंत महत्त्वाचं

शुक्रवारी (ता.29) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रवेशाच्या सातव्या फेरीचे प्रवेश पार पडले. यात दहावी पास विद्यार्थी तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. या विद्यार्थ्यांना शनिवार (ता.30) पर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. मुंबई विभागात या फेरीमधील 18 हजार 317 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रवेश घेतले आहेत.

मोठी बातमी :  वाहन परवान्याबाबत मोठी बातमी, कोर्टाच्या निर्णयानंतर परिवहन आयुक्तांनी दिल्या महत्वपूर्ण सूचना

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेशाच्या आतापर्यंत 7 फेऱ्या पार पडल्या असून या फेऱ्यानंतर अकरावीच्या 82 हजार 240 जागा रिक्त राहिल्या आहेत. सातव्या फेरीत 22 हजार 919 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले होते. त्यापैकी 18 हजार 317 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर 459 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.

प्रवेशच न मिळालेले तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीतील प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसे द्यायचे याचा निर्णय रिक्त जागा जाहीर झाल्यानंतर होण्याची शक्‍यता आहे. रिक्त जागांचा अहवाल 31 जानेवारीला अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

mumbai college admission news 82 thousand seats are still vacant in MMR region

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai college admission news 82 thousand seats are still vacant in MMR region for FYJC