वाहन परवान्याबाबत मोठी बातमी, कोर्टाच्या निर्णयानंतर परिवहन आयुक्तांनी दिल्या महत्वपूर्ण सूचना

प्रशांत कांबळे
Saturday, 30 January 2021

यासबंधीत राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी परिपत्रक जाहीर केले आहे

मुंबई ,ता.30 : यापूर्वी खासगी वाहन आणि मालवाहतुक किंवा प्रवासी वाहतूक यासाठी वेगवेगlळा चालक परवाना अनिवार्य होता. मात्र, आता एका याचिकेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकाच चालक परवान्यावर मालवाहतूक आणि खासगी वाहतूक चालवता येणार असून, प्रवासी वाहतूक सुद्धा करता येणार आहे. मात्र, प्रवासी वाहतुकीसाठी फक्त बॅच बिल्ला अनिवार्य राहणार आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेश दिले असून, यासबंधीत राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये प्रवासी वाहतूक वगळता इतर कोणत्याही चारचाकी वाहनांसाठी हलक्या मोटार वाहनांचा परवाना पुरेसा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तर यासबंधीत सूचना जाहीर करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना  दिल्या आहे.

खालील महत्त्वाच्या बातम्याही वाचा :

Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

-----------

Fake TRP | रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांवर 19 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई नाही

-----------

BIG NEWS शिवसेना घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, भेटीचं कारण आहे अत्यंत महत्त्वाचं

-----------

mumbai news freight and private transport can be operated on a single drivers license


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news freight and private transport can be operated on a single drivers license