मुंबई : मुंबईतील एका नामांकित कॉलेजच्या शिक्षिकेला 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत कारवाई केली आहे. 40 वर्षीय विवाहित आणि मुलांची आई असलेल्या या शिक्षिकेने वर्षभराहून अधिक काळ विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.