मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा तोडगा सुटता सुटेना ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मिलींद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाला नियुक्त करायचे हा प्रश्‍न श्रेष्ठींसमोर आहे. 

मुंबई : मिलींद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाला नियुक्त करायचे हा प्रश्‍न श्रेष्ठींसमोर आहे. 

मुंबई अध्यक्षपद आणि विधानसभा निवडणूकीसाठी समिती करायची का या देवरा यांच्या प्रस्तावावर कॉग्रेस हायकमांड ऑगस्ट महिन्यापर्संत निर्णय घेणार असल्याचे समजते. 

देवरा यांना अध्यक्षपदावर कायम ठेवत तीन समिती सदस्य नियुक्त करण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरू आहेत. 

एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई यासह तीन जणांचा समितीत समावेश होण्याची शक्‍यता असली तरी मुंबई अध्यक्षपदाचा तोडगा अद्याप निघाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Congress president issue