

Demand for SC Candidates in Local Polls
Sakal
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव मतदारसंघात अनुसूचित विभागाने शिफारस केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी केली आहे.दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या बैठकीस प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी. एम. संदीप प्रमुख उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या विविध फ्रंटल संघटना, विभाग व सेलचे अध्यक्ष देखील उपस्थित होते.