
मुंबईत कोविडच्या प्रत्येक रुग्णावर 49 हजारच्या आसपास खर्च केला आहे.
मुंबई: मुंबईत कोविडच्या प्रत्येक रुग्णावर 49 हजारच्या आसपास खर्च केला आहे. महानगर पालिकेने कोविडचे उपचार, प्रतिबंध यासह नव्या यंत्र सामुग्रीच्या खरेदीसाठी 1470 कोटी 95 लाख रुपये खर्च केले आहे. कोविड संबंधित कामांसाठी 161 कोटी 69 लाख खर्च करण्यात आला आहे. असे 1632 कोटी 64 लाख रुपये महानगर पालिकेने कोविडसाठी खर्च केले आहे.
कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेला अकस्मित निधी संपल्याने अतिरिक्त 450 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मंजूरी स्थायी समितीने दिली आहे. या प्रस्तावात पालिकेने आतापर्यंत झालेल्या खर्चाचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार सर्वाधिक खर्च हा प्रभागातील नियोजन आणि सेव्हन हिल्स रुग्णालयासाठी तब्बल 453 कोटी 19 लाख रुपये खर्च करण्यात आला. मुंबईत आतापर्यंत 2 लाख 94 हजार पर्यंत कोविडचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. जी उत्तर प्रभागात महानगर पालिकेने 35 कोटी 26 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. हा प्रभागात झालेला सर्वाधिक खर्च आहे. या प्रभागात धारावीचा समावेश आहे.
अधिक वाचा- मलेरियाचे अचूक निदान शक्य, कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल ठरणार वरदान
मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणा मार्फत कोविडसाठी सर्व प्रकारची खरेदी करण्यात येत होती. या विभागाने 182 कोटी 74 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. जंम्बो कोविड केंद्रातील सर्वाधिक खर्च महानगर पालिकेने बीकेसी कोविड केंद्रावर 44 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.
कोविड काळात झालेला खर्च
-------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai corona patient costs rupees 50 thousand per patient