मुंबईतील रुग्णसंख्या 1,50,095 वर, आज 1,526 नव्या रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Friday, 4 September 2020

मुंबईत आज 1,526 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,50,095 झाली आहे. मुंबईत आज 37 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,761 वर पोहोचला आहे.

मुंबई : मुंबईत आज 1,526 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,50,095 झाली आहे. मुंबईत आज 37 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,761 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 859 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे. 

 मुंबईत आज नोंद झालेल्या 37 मृत्यूंपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 20 पुरुष तर 17 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 37 रुग्णांपैकी 27 रुग्णांचे वय 60 वर्षावरील होते तर 10 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते.                  

आज 859 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,20,561 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 78 दिवसांवर गेला आहे. 2 सप्टेंबरपर्यंत एकूण 7,92,785  कोविड चाचण्या करण्यात आल्या. 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.90 इतका आहे. 

हेही वाचाः  सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी, मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या 'या' सूचना

मुंबईत 558 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,718 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 6008 अति जोखमीचे रुग्ण आहेत. तर 2,536 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

धारावीतील रुग्णसंख्या 2800 वर

धारावीमध्ये आज दिवसभरात 8 नवीन रूग्णांची भर पडली असून एकूण रूग्णसंख्या 2800 इतकी झाली आहे.  98 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादरमध्ये आज 20 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2800 इतकी झाली आहे.  359 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये आज 31 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2337 इतकी झाली. तर 287 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

अधिक वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण

 धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात आज 59 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 7,797 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 506 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,432,दादरमध्ये 2199 तर माहीममध्ये 1848 असे एकूण 6,579 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर 744 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai Corona patients increased 1,50,095, adding 1,526 new patients today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Corona patients increased 1,50,095, adding 1,526 new patients today