esakal | Corona Update: मुंबईत बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update: मुंबईत बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई- शहरात आज दिवसभरात 8839 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,61,998 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 85,226 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत गुरुवारी 9033 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 4,63,344 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शुक्रवारी 53 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे.

मृतांचा आकडा 12 हजार 242 वर पोहोचला आहे.आज मृत झालेल्यापैकी 26 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 36 पुरुष तर 17 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  13 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 37 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.60 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 43 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 48,51,752 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचा: पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूनी एकाच दिवशी ओलांडला शंभराचा आकडा

मुंबईत 97 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1,169 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 38,858 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 1,110 करण्यात आले.

हेही वाचा: कोरोना, लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे ५०० कोटीचे नुकसान

जी उत्तर मध्ये 228 नवे रुग्ण

जी उत्तर मध्ये आज 228 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 21,836 झाली आहे. धारावीत आज 36 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 5932 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 102 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 7916 झाली आहे. माहीम मध्ये 90 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 7988 इतके रुग्ण झाले आहेत.