esakal | बीकेसी कोविड केंद्र सोमवारनंतर होणार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Covid care center

बीकेसी कोविड केंद्र सोमवारनंतर होणार सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • बीकेसी, मुलुंड, दहिसरची जंबो कोविड सेंटर्स बंदच राहणार असं सांगण्यात आलं होतं

मुंबई: शहरातील बीकेसी कोविड केंद्र रुग्णांसाठी आता लवकरच सुरू होणार आहे. येत्या सोमवारनंतर ते खुले करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर आणि उपनगरातील बीकेसी, मुलुंड आणि दहिसर येथील जंबो कोविड केंद्रांना दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. पण, यापैकी बीकेसी केंद्राचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून ते लवकरच सुरू होईल असं सांगण्यात आलंय. सोमवारी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आम्ही पूर्ण तयारीनिशी आहोत, असे बीकेसी कोविड केंद्राचे अधिष्ठाता डाॅ. राजेश ढेरे यांनी सांगितले. (Mumbai Corona Update BKC Jumbo Covid Center to start after Monday)

हेही वाचा: मुंबईत पाऊस is Back!! लोकल सेवा सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली

महिनाभर 400 डोसची उपलब्धता-

पावसामुळे लसीकरण मोहिमेला काही अंशी फटका बसला पण दिवसभरात 400 नागरिकांचे लसीकरण झाले. गेला महिनाभर केंद्राला 400 डोस उपलब्ध होत असून 200 कोव्हॅक्सिन आणि 200 कोव्हिशिल्डचे डोस मिळत आहेत. त्यामुळे लसीकरणाची संख्या कमी होत आहे, असेही डाॅ. ढेरे यांनी सांगितले. फक्त लसीकरणासाठीच कोविड केंद्र सुरू आहे. पण, रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. पुढच्या आठवड्यापासून रुग्णांनाही दाखल करुन उपचार केले जाईल. सध्या ऑडिट, स्ट्रक्चरल बाबी पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार, आता लवकरच केंद्र पुर्वीसारखे सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे

तौक्ते चक्रीवादळानंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर आणि उपनगरातील तीन मोठ्या जंबो कोविड केंद्रांना दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. ही केंद्र पुन्हा 1 जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो कोविड ही तिन्ही केंद्रे सद्यस्थितीत सुरू होणार नाहीत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली तरच ही तीन केंद्रे सुरू केले जातील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण आता सोमवारनंतर यातील बीकेसीचे केंद्र सुरू केलं जाईल असं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: मुंबई: 22 जणांचा मृत्यू; 660 नव्या रुग्णांची भर