मुंबई : नायर रुग्णालयात 2 ते 11 वयोगटातील मुलांसाठी क्लिनिकल ट्रायल | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children corona

मुंबई : नायर रुग्णालयात 2 ते 11 वयोगटातील मुलांसाठी क्लिनिकल ट्रायल

मुंबई : लहान मुलांना (Children) देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस (corona vaccine) मिळावी यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पालकांकडून हवा तसा प्रतिसाद या लसीकरणासाठी मिळत नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. सध्या नायर रुग्णालयात (Nair hospital) 2 ते 11 या वयोगटातील लहान मुलांसाठी लसीची क्लिनिकल ट्रायल (clinical trail) सुरू झाली आहे.  सोमवारपासून सुरू झालेल्या या लसीकरणाला आता तरी प्रतिसाद मिळत असून या वयोगटातील आतापर्यंत 10 मुलांचा क्लिनिकल ट्रायलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: एसटीच्या 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्तीच्या नोटीस

यातील काही मुलांना लस आणि काहींना प्लासिबो देण्यात आला आहे. तसंच, 50 हून अधिक पालकांनी या ट्रायल मध्ये सहभाग घेण्यासाठी नायर रुग्णालयात संपर्क करुन विचारपूस केली आहे. या मुलांवरही कोव्होवॅक्स लसीची ट्रायल सुरु आहे. याआधी नायर रुग्णालयात 12 ते 18 या वयोगटातील 20 मुलांचा समावेश करत लसीकरण करण्यात आले आहे. सोमवारपासून 2 ते 7 आणि 7 ते 11 अशा दोन वयोगटातील मुलांसाठी ट्रायल सुरु झाली आहे. त्यामुळे, किमान या वयोगटातील ट्रायलला पालक आणि मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा डाॅक्टर्स व्यक्त करतात.

या आधी नायर रुग्णालयात झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी या लसीची ट्रायल घेण्यात आली तेव्हा ही लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता, त्यानंतर कोवोवॅक्स या लसीची 12 ते 18 या वयोगटासाठी ट्रायल घेतली गेली. ही ट्रायल पूर्ण झाल्यानंतर आता 2 ते 11 या वयोगटासाठी लसीकरण ट्रायल घेतली जात आहे.  दरम्यान, या वयोगटासाठी देशभरातील 10 केंद्रांवर 230 लहान मुलांची गरज आहे.  शिवाय, लस किंवा प्लासिबो घेतल्यानंतर डाॅक्टरांना सहा महिने पाठपुरावा करावा लागणार आहे अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

लसीकरणातील अडचणी

मुलांमध्ये अँटिबाडी निर्माण झाल्याने ट्रायल साठी कमी संख्येत मुलं आढळून येत आहेत. ही बाब लहान मुलांसाठी लस निर्मितीत प्रमुख अडसर ठरत आहे. मुंबईत जवळपास 50 टक्के मुलांच्या शरीरात कोविडला तोंड देणाऱ्या अँटीबॉडिजची निर्मिती झाली आहे. आणि या क्लिनिकल ट्रायलला अँटीबॉडीज तयार न झालेली मुले हवी असल्याने अशी पात्र मुलं शोधणं नायर रुग्णालयासाठी आव्हान ठरत आहे.

हेही वाचा: कल्याण : मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

केवळ आरोग्यासंबंधित कोणत्याही तक्रारी नसलेल्या सुदृढ मुलांवरच  आणि नवीन अँटीबॉडीज न बनलेल्या मुलांना या चाचणीमध्ये समाविष्ट केले जात आहे. चाचणीपूर्वी सर्व आरोग्य चाचण्या केल्या जातील. जर मुलगा किंवा मुलगी तपासाच्या मानदंडात पात्र सिद्ध झाले, तरच त्याला चाचणीमध्ये समाविष्ट केले जाईल. चौकशीसाठी इच्छुक पालक 022- 23027205, 23027204 वर संपर्क साधू शकतात. या चाचणीत पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

चाचणीसाठी संमती गरजेचे

चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त केले जाईल. पालकांना ऑडिओ-व्हिडिओ आणि लेखी स्वरूपात संमतीपत्र द्यावे लागेल. 7 ते 11 वर्षांच्या मुलांच्या पालकांनी तोंडी संमती देणे आवश्यक आहे.

loading image
go to top