esakal | मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 546 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू | mumbai corona update
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 546 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : ऐन उत्सवांच्या काळात मुंबईतील बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा दैनंदिन आकडा 500 च्या वर गेला असून आज दिवसभरात कोरोनाच्या 546 नवीन रुग्णांची नोंद (corona new patients) झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,49,620 वर पोहोचली आहे. तर 337 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,25,619 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

हेही वाचा: शिवसेना सत्तेत असताना मराठी भाषेची पीछेहाट

आज 5 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,172 वर पोहोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1151  दिवस झाला.आज दिवसभरात 37,007 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,08,56,715 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 5317 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image
go to top