कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक

मुंबई : कोरोना संसर्गाचा (corona infection) वेग मंदावला असून परिस्थिती नियंत्रणात (corona patients decreases) येत असल्याचे दिसते. कोरोना नवीन रुग्णांपेक्षा (corona new patients) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसात 3622 नवीन बाधित रुग्ण सापडले तर 4048 रुग्ण कोरोना मुक्त (corona free patients) झाले आहेत.

हेही वाचा: जामीन मिळण्यासाठी आनंद तेलतुंबडेंचा विशेष NIA न्यायालयात अर्ज

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 300 ते 350 च्या दरम्यान होता. गेल्या 15 दिवसात त्यात कमालीची घट झाली आहे. 10 नोव्हेंबर ला मुंबईत 38,661 कोरोना चाचण्या झाल्या होत्या. त्यापैकी 347 बाधित रुग्ण सापडले होते. पॉझिटिव्हीटी रेट 0.90 इतका होता. तर 3 रुग्ण दगावले होते.

पुढील दहा दिवसांत परिस्थितीत आणखी सुधार झाला. 22 नोव्हेंबर ला बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन 176 पर्यंत खाली आली.पॉझिटीव्हीटी रेट देखील कमी होऊन 0.71 झाला. या दिवशी 24,798 चाचण्या करण्यात आल्या. या दरम्यान चाचण्यांची संख्या देखील 12 ते 15 हजाराने घसरल्याचे दिसले.बाधित होण्याचे प्रमाण कमी झाल्याने चाचण्यांची संख्या देखील कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: "राजकारण न करता 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी"

कोरोना संसर्ग कमी झाल्याने रुग्णवाढीचा वेग देखील मंदावला आहे. पंधरा दिवसांपूर्वी 0.90 टक्के असणारा पॉझिटिव्हीटी रेट हळूहळू कमी होऊन 0.72 टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. डिसेंबर पर्यंत पोझिटिव्हीटी रेट आणखी कमी करण्याचा प्रयत्न ही आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. पंधरा दिवसांपूर्वी दैनंदिन 4 ते 5 मृत्यू होत होते. दैनंदिन मृत्युदर 2.38 वर गेला होता. काही दिवसांनी दैनंदिन मृत्यू कमी होत 1 ते 2 पर्यंत खाली आले होते. त्यावेळी दैनंदिन मृत्यूदरात 0.91 पर्यंत घट झाली होती.सध्या मृत्यूचा आकडा पुन्हा वाढत असून सोमवारी 3 तर मंगळवारी 4 मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे मृत्युदरही वाढून पुन्हा 2.27 वर गेला आहे.

गेल्या 15 दिवसात 3622 नवीन रुग्णांची भर पडली आहे. असे असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक असून 4048 रुग्ण बरे झाले आहेत. पंधरा दिवसात 5,06,273 कोरोना चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी रेट 0.72 टक्के आहे.तर एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसातील मृत्युदर 0.93 टक्के आहे. मुंबईत करोना परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र युरोप वाढलेला कोरोना संसर्ग पाहता आपल्याला आणखी तीन महिने काळजी घेण्याची गरज आहे. दैनंदिन मृत्यूमध्ये 1-2 ची वाढ झाली असली तरी गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात मृत्यूचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखे काही नाही असे राज्य टास्क फोर्स चे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

loading image
go to top