esakal | Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.6 % पर्यंत घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Report

Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.6 % पर्यंत घसरला

sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात (Corona Virus) दिसत असून रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.6 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा (New Corona Patient) आज दुप्पट रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 1,035 दिवसांवर गेला आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा (Active Corona Patients) आकडा कमी होऊन 6,349 हजारांवर आला आहे. मुंबईत (Mumbai) आज 402 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,31,563 इतकी झाली आहे.आज 5,77 रुग्णांनी कोरोनावर मात ( Corona free Patient ) केली असून आतापर्यंत 7,07,129 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 77,89,733 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (Mumbai Corona update in detail corona patients Average situation reports-nss91)

हेही वाचा: Mumbai Train: कपडा व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला, अर्थचक्र कोलमडले!

मुंबईत आज दिवसभरात 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 716 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 9 पुरुष तर 5 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 5 रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते.तर 7 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

loading image