Mumbai Corona Update : मुंबईत 196 नवीन रुग्ण ; केवळ 1 कोरोनामुळे मृत्यू

आतापर्यंत 7,40,260 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
mumbai corona
mumbai corona sakal

मुंबई : आज 196 नवीन रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काहीशी वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,61,518 वर पोहोचली आहे. आज 258 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,40,260 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील नवीन रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2388 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून  2526 दिवस झाला आहे.मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे. 

मुंबईत मृत्यूंची संख्या नियंत्रणात असून आज केवळ एका कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,311 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.

mumbai corona
मुंबईत 14 हजार बालकांना कोविड ची बाधा

मुंबईत कोविड चाचण्या कालच्या तुलनेत वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 29,597 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,21,94,972 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com