मुंबईतील उपचाराधीन रुग्णसंख्येत 35 टक्क्यांनी घट | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

मुंबईतील उपचाराधीन रुग्णसंख्येत 35 टक्क्यांनी घट

मुंबई : मुंबईतील कोरोना बधितांच्या (corona patients) संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने आठवड्याभरात उपचाराधीन रुग्णांची (patients under treatment) संख्या तब्बल 35 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. 2 नोव्हेंबर पर्यंत मुंबईत 3,204 उपचाराधीन रुग्ण होते. पुढील आठवडयाभरात त्यात घट होऊन 2,903 इतके झाले. राज्यातील एकूण उपचाराधिन रुग्णांपैकी हे 21.81 टक्के रुग्ण आहेत.

हेही वाचा: कंगणा राणावत विरोधात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत केवळ 168 रुग्णांची भर पडली. तर 3 ते 9 नोव्हेंबर दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या 132 पर्यंत खाली आली. आठवड्याभरात उपचाराधीन रुग्णांमध्ये 35 टक्के घट झाली. राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे 4,250 सह पहिल्या क्रमांकावर तर 3,204 रुग्णांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ठाणे 2002 तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत बाधित रुग्णांसह उपचाराधीन रुग्ण देखील कमी होत असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

loading image
go to top