esakal | मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर आजही लसीकरण बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccines

मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर आजही लसीकरण बंद!

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी (Unavailable Vaccines) आज 10 जुलै 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण (Corona Vaccination) बंद राहणार आहे. दरम्यान, गुरुवारीही लसीकरण बंद (Vaccination Closed) ठेवण्यात आले होते. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या (Weekly Off) दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. त्यामुळे, मुंबईकर नागरिकांनी (Mumbai People) मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाला सहकार्य करावे तसेच पालिका लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Corona Vaccination closed today also due to less vaccines)

हेही वाचा: म्हाडातील अधिकारी आणि दलालांच्या भ्रष्ट युतीला जितेंद्र आव्हाडांनी दिला दणका

नेस्को कोविड केंद्रांबाहेर गर्दी

दरम्यान, काल शुक्रवारी लसीकरण बंद असूनही सकाळपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे, पालिकेकडून लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

loading image