esakal | मुंबई : सप्टेंबर मध्ये दिले 29 लाख 51 हजार 157 डोस; विक्रमी लसीकरणाची नोंद | Corona vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

मुंबई : सप्टेंबर मध्ये दिले 29 लाख 51 हजार 157 डोस; विक्रमी लसीकरणाची नोंद

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : अधिकाधिक मुंबईकर (Mumbai) नागरिकांचे आणि सर्व समाज घटकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) करण्यासाठी मुंबई महानगरपालिका (bmc) प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणून सप्टेंबर 2021 या एकाच महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची (record break vaccination) नोंद झाली आहे.

हेही वाचा: सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण; हॉटेल व्यावसायिक कुणाल वाणीला अटक

एकट्या सप्टेंबर महिन्यात 29 लाख 51 हजार 157 डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे. दर महिन्यागणिक लसीकरणाचा वेग वाढता असून जानेवारीपासून आजपर्यंत, सर्व कोविड लसीकरण केंद्र मिळून 1 कोटी 23 लाख 11 हजार 541 मात्रा दिल्या गेल्या आहेत. 10  लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबईतील लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे.

जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे 10 लाख लशींचा सरासरी साठा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जवळपास दुप्पट म्हणजे 19 लाख 25 हजार 140  लससाठा प्राप्त झाला. तरीही संपूर्ण लससाठ्याचा विनियोग होईल, अशा रितीने लसीकरणाला वेग देण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

हेही वाचा: मुंबई : ४८ वर्षांच्या वाहतूक पोलिसाला कारचालकाने फरफटत नेले; गुन्हा दाखल

प्रारंभापासून विचार करता, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून 16 जानेवारी 2021 ते आज 30 सप्टेंबर 2021 (सायंकाळी 7 वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-19 प्रतिबंधक लशीच्या 1 कोटी 23 लाख 11 हजार 541 इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाला या कालावधीत एकूण 77 लाख 62 हजार 470 लसींचा साठा प्राप्त झाला. त्यातून आजवर 76 लाख 96 हजार 833 एवढ्या मात्रा देण्यात आल्या. मुंबईकर नागरिकांचे लसीकरण अत्यंत वेगाने करण्यात येत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात, 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांचा विचार केला तर वेगाने लसीकरण करण्याबाबत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.

loading image
go to top