esakal | सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण; हॉटेल व्यावसायिक कुणाल वाणीला अटक | Sushant singh rajput
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput

सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण; हॉटेल व्यावसायिक कुणाल वाणीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant singh rajput) आत्महत्येनंतर (sucide) उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात (drug case) हॉटेल व्यावसायिक असलेल्या कुणाल वाणी (kunal wani) याला बुधवारी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिकार्‍यांनी अटक केली.

हेही वाचा: शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या काही दिवसांपासून कुणाल हा फरार होता, अखेर त्याला बुधवारी खार येथून ताब्यात घेऊन ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. वांद्रे येथील राहत्या सुशांतसिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास नंतर वांद्रे पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले होते.

हेही वाचा: एचआयव्ही रुग्णांमधील मधुमेह, उच्च रक्तदाब शोधण्यासाठी मोहीम

त्यामुळे त्याचा तपास नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवती, तिचा भाऊ शौविक चक्रवतीसह इतर आरोपींना एनसीबीने अटक केली होती. याच गुन्ह्यांत काही ड्रग्ज पेडलरवर कारवाई झाली होती. त्यांच्या चौकशीत कुणाल वाणी याचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र या घटनेनंतर कुणाल हा पळून गेला होता. त्याचा एनसीबीकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला बुधवारी खार येथून या पथकाने अटक केली.

कुणाल हा हॉटेल व्यावसायिक असून सुशांतचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी दिपीका पादुकोण, सारा अली खान, नुकुल प्रीत यांचीही एनसीबीकडून चौकशी करुन त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. कुणालविरुद्ध नंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

loading image
go to top