मुंबईत कोरोना रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये, खासगी रुग्णालयातील बेड्स फुल्ल

मुंबईत कोरोना रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये, खासगी रुग्णालयातील बेड्स फुल्ल

मुंबई: कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईतील खासगी रुग्णालयातील बेड्स फुल्ल झाले आहेत. मुंबईतील बॉम्बे, सैफी, लीलावती, नानावटी, हिरानंदानी आणि इतर सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बेड्सची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना प्रतीक्षा यादीत जावे लागत आहे. दरम्यान पालिका अधिकाऱ्यांकडून 24 टक्के बेड्स रिकाम्या असल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात बेड्स रिक्त नसल्याने उपचारांसाठी 5 ते 7 दिवस वाट पाहावी लागेल असे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत असल्याचे समोर आले आहे. 

सध्या मुंबईत दररोज 5 हजाराच्या सरसरीत रुग्ण आढळून येत आहेत. यात गंभीर रुग्ण नसले तरी काही रूग्ण ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना रुग्णालयातच दाखल करावे लागत आहे. तर काही रूग्ण खासगी कोरोना रुग्णालयात दाखल होण्यास इच्छुक असल्याकारणाने या रुग्णालयातील बेड्स फुल्ल झाले आहेत. तथापि, सर्व रुग्णालयांमध्ये 24 टक्के बेड रिक्त असल्याचे नागरी समितीचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अस्थायी लोकसंख्येमुळे रूग्णाच्या बेड रिक्त नसल्यामुळे त्यांना सात दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या मध्यम स्वरुपाचे लाक्षणिक रुग्ण येत आहेत. 

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक रुग्ण हे उच्चभ्रू इमारतींमधील असतात आणि त्यांना खासगी रुग्णालयात बेड हवे असतात आणि त्यामुळे गरजू रुग्णांना प्रतिक्षा यादीत राहावे लागते. 

बेड रिक्त नसण्याचे मुख्य कारण म्हणजे बरेचसे रुग्ण हे सौम्य लक्षण असणारे किंवा कमी लक्षणे असणारे येतात. पण, त्यांना रुग्णालयात दाखल करुन घ्यावे लागते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला की त्याला डिस्चार्ज दिला जातो. पण रुग्णसंख्या वाढल्याने बेडस पूर्ण भरले आहेत आणि कित्येक रुग्णांना प्रतिक्षा यादीत ठेवावे लागते, असे ही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, पालिकेनं खासगी रुग्णालयांना कोविड बेड्सची संख्या सध्याच्या 3,111 वरून 5, हजार पर्यंत वाढवण्यास सांगितले आहे. शहरात जवळपास 13 हजार बेड्स असून येत्या आठवड्यात ते 21 हजार पर्यंत वाढवण्याची योजना आहे.

खासगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भंसाळी यांनी सांगितले की, “गरज भासणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेडसाठी फोन कॉल्स येत आहेत. शिवाय, जेव्हा केसेस कमी झाले होते तेव्हा त्यांनी कोविड बेड्स कमी केले होते. मात्र आता ते वाढवून 80 बेडपर्यंत आणले आहेत. कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा 150 हून अधिक कोविड बेड होते. मात्र, नंतर केसेस कमी झाल्याने ते बेड नॉन कोविड रुग्णांसाठी वापरले गेले. जवळपास 10 ते 15 बेड्स कमी केले गेले. पण आता 11 आयसीयू बेड्ससह 39 बेड्स आहेत जे भरलेले आहेत. आता आणखी 40 बेड्स वाढवून 10 आयसीयू बेड्स ही वाढवले जाणार आहेत. 

पालिकेत 30 टक्के बेड्स रिक्त

आताच्या परिस्थितीसाठी पालिकेची पूर्वतयारी असून आजही जवळपास 30 टक्के बेड्स रिक्त आहेत. बेड्सची क्षमता आणखी वाढवली जाणार आहे. सध्या 16 हजारांपर्यंत बेड्स नव्याने वाढवले आहेत. त्यांची संख्या येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये 22 हजार बेड्स तयार होतील. त्यातून रुग्णांना उपचार घेणे सोयीस्कर होईल. 
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona Virus beds private hospital full waiting list Increasing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com