esakal | मुंबईकरांसाठी चांगली बातमी: सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घ

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus Updates
मुंबईकरांसाठी चांगली बातमी: सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये 8 टक्के घट दिसून आली आहे. गेल्या 10 दिवसांच्या या आकडेवारीनुसार, ही माहिती समोर आली आहे. दरम्यान पुढच्या आठवड्यांपर्यंत आणखी घट होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 11 एप्रिलपर्यंत 92 हजार 464 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही संख्या 21 एप्रिलला कमी होऊन 84 हजार 743 वर पोहोचली.

पालिकेनं 'ब्रेक द चेन' या मिशनअंतर्गत राबवलेल्या उपाययोजना आणि कार्यवाही यामुळे ही संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या एका आठवड्यापासून शहरात जवळपास 7 हजार ते 9 हजार प्रकरणे नोंदली जात आहेत. पुढील आठवड्यात ही रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Virar Hospital Fire: १३ मृतांची नावे आली समोर

पालिकेचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 87 टक्के सक्रिय प्रकरणे एसीम्प्टोमॅटिक आहेत. फक्त 2 ते 3 टक्के गंभीरवस्थेत असून ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. आम्ही केवळ नागरिकांना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सांगत आहोत. कोविड 19 चे जे नियम आहेत ते पाळले गेले तर नक्कीच रुग्णसंख्येत घट दिसेल.

हेही वाचा: Virar Hospital Fire: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

शहरातील रुग्णसंख्येवर नियंत्रणासोबत मृत्यू कमी करणे ही देखील पालिकेसमोर एक चिंता आहे. त्यानुसार सर्व कोविड -19 रुग्णालयांना मिशन सेव्ह लाइफचे अनुसरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अजूनही दैनंदिन मृत्यू दर 0.6 च्या खाली आहे. या महिन्यात कोविड -19 मुळे शहराचा मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.

संसर्ग प्रमाण कमी झालेले नाही

लोकांना आता संसर्गाची काळजी आहे. बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. माझे कुटुंब माझे जबाबदारी याअंतर्गत लोकांचा सहभाग वाढला आहे. या लॉकडाऊनमुळे दोन ते तीन दिवसांतच चांगला फरक दिसेल. घरातही त्रिसुत्रींचा वापर केला पाहिजे. संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या चार ते पाच दिवसांत रुग्णांच्या संख्येत स्थिरता आली आहे. अजूनही सतर्क राहणे गरजेचे आहे.

डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका रुग्णालये

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai corona virus update 8 percent decline active patients