esakal | मुंबईकरांनो, थांबा... लसीकरणासाठी जाण्याआधी ही बातमी वाचाच!

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो, थांबा... लसीकरणासाठी जाण्याआधी ही बातमी वाचाच!

मुंबईकरांनो, थांबा... लसीकरणासाठी जाण्याआधी ही बातमी वाचाच!

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या कोरोना थैमान घालत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण वैद्यकीय उपचारांवर जोर दिला जात आहे. त्याचसोबत राज्यात लसीकरणावरही भर दिला जातोय. पण राज्यात होणारं लसीकरण आणि केंद्रातून मिळणारा लसीकरणाचा साठा याचा अद्याप मेळ बसत नसल्याने काहीशी अडचण येताना दिसतेय. मुंबईत तर काही दिवसांपूर्वी लसीकरण केंद्रावरील साठा संपल्याने नागरिकांना परत पाठवण्यात आले होते. असाच काहीसा प्रकार सध्याही घडत आहे. मुंबईतील १३२ पैकी ६१ लसीकरण केंद्र बंद असल्याची माहिती आहे. जवळपास ५० टक्के लसीकरण केंद्र बंद असल्याने उर्वरित लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहेत.

हेही वाचा: अत्यावश्यक सेवेसाठी लागू केलेला 'कलर कोड'चा निर्णय रद्द

आतापर्यंत मुंबईमध्ये २१ लाख २८ हजार नागरिकांचं लसीकरण झालंय. १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण करण्याची परवानगी दिल्यामुळे पालिकेकडून जोरदार तयारी केली जात आहे. मुंबईत १८ वर्षावरील सुमारे ८० लाख नागरिक असल्याचा अंदाज आहे. सध्या पालिकेची ४० खासगी ७० आणि केंद्र आणि राज्य सरकारची काही अशी मिळून १३२ लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी मुंबई महापालिका लसीकरण केंद्रांची संख्या ४० वरून १०० पर्यंत वाढवणार असल्याची माहिती आहे. नवी लसीकरण केंद्र रेल्वे स्थानकांच्या पूर्व आणि पश्चिम विभागात उभारली जातील, असं सांगण्यात आलंय. तसेच पालिका लस विकत घेण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा: कोरोना संकटात मुंबईकरांसाठी एक चांगली दिलासादायक बातमी

दरम्यान, गेल्या १० दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये 8 टक्के घट दिसून आली आहे. पुढच्या आठवड्यांपर्यंत आणखी घट होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 11 एप्रिलपर्यंत 92 हजार 464 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही संख्या 21 एप्रिलला कमी होऊन 84 हजार 743 वर पोहोचली. पालिकेने 'ब्रेक द चेन' या मिशन अंतर्गत राबवलेल्या उपाययोजना आणि कार्यवाही यामुळे ही संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या एका आठवड्यापासून शहरात जवळपास 7 हजार ते 9 हजार प्रकरणे नोंदवली जात आहेत. पुढील आठवड्यात ही रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.