esakal | Covid-19: मुंबईत गेल्या 24 तासांत 500 पेक्षाही कमी नवे रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai corona

Covid-19: मुंबईत गेल्या 24 तासांत 500 पेक्षाही कमी नवे रूग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील आणि मोठ्या शहरातील कोरोनाची स्थिती आता आटोक्यात येऊ लागली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 500 पेक्षाही कमी म्हणजेच 478 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7, 28, 174 इतकी झाली आहे. तशातच एकूण 701 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7, 03, 077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय, मुंबईत गेल्या 24 तासांत 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात 7 पुरुष तर 2 महिला रुग्णांचा समावेश होता. (Mumbai Coronavirus Update City has below 500 new cases in last 24 hours)

हेही वाचा: "लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या"

मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत असून रुग्णवाढीचा सरासरी दर 0.7 % पर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 926 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 7, 120 हजारांवर आला आहे.

हेही वाचा: मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

गेल्या 24 तासांत धारावीमध्ये 1 नवा रुग्ण सापडला असून धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 6917 आहे. तर धारावी मध्ये केवळ 16 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये 18 रुग्ण आढळले. दादर एकूण रुग्णसंख्या 9774 झाली आहे. माहीम मध्ये 6 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 10,090 झाले आहेत. जी उत्तर मध्ये 25 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,781 झाला आहे.

loading image