esakal | मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक
sakal

बोलून बातमी शोधा

pravin-darekar-Uddhav-T

मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई : मुंबई लोकल ट्रेन ( Mumbai Local train) सर्वांसाठी सुरु करण्याबाबत प्रवासी संघटना (traveler Union) सातत्याने राज्य सरकारकडे (state Government) मागणी करत आहेत. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही मुंबई लोकल ट्रेन सुर करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (CM Uddhav Thackeray) पत्र पाठवले होते. दरेकर यांनी लोकल सुरु करण्यासंदर्भात आंदोलनाचा (Strike) इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांना फोन केला आहे. त्यांनी मुंबई उपनगरीय व कसारा-कर्जत-ठाणे-मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात तपशीलवार चर्चा केली आहे. लोकल सुरू करण्यातबाबत राज्य सरकार (State Government Reaction) सकारात्मक भूमिका घेत आहे. असे आश्वासन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं आहे. ( State Government is in positive mind set for Mumbai local train journey to all CM Uddhav Thackeray to Pravin Darekar)

हेही वाचा: रायगड जिल्ह्यात कोसळला मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती!

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत असल्यामुळं लॅाकडाऊनचे निर्बंध अंशत: शिथिल करुन राज्य सरकारने दिलासा दिला होता. मात्र, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनने सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. तसेच खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांनाही खासगी प्रवासाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी संघटनांकडूनही राईट टू ट्रव्हल चळवळ सोशल मीडियाद्वारे सुरु करण्यात आलीय.

loading image