esakal | Coronavirus: मुंबईत 545 नवे रूग्ण तर 505 जणांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 coronavirus

Coronavirus: मुंबईत 545 नवे रूग्ण तर 505 जणांची कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेल्या 24 तासांत 13 रूग्णांचा मृत्यू

मुंबई: शहरात गेल्या 24 तासात 545 नवीन रुग्ण सापडले त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,29,795 इतकी झाली आहे. दिवसभरात 505 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,04,764 रुग्ण कोरोनामुक्त झाले. याशिवाय, मुंबईत दिवसभरात 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 7 पुरुष तर 6 महिला होत्या. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 667 इतका झाला आहे. (Mumbai Coronavirus Update New Cases 545 while 505 patients become corona free)

हेही वाचा: पावसाने काढली मुंबईकरांची 'विकेट'; लोकल, रस्तेवाहतूक कोलमडली

मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत असून रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.7 % पर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 948 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 7,012 हजारांवर आला आहे.

हेही वाचा: 'टी सिरिज'च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल

धारावीमध्ये 5 रुग्ण आढळले असून धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 6929 आहे. दादरमध्ये 9 रुग्ण आढळले. दादरची एकूण रुग्णसंख्या  9797  झाली आहे. माहीममध्ये 10 नवे रुग्ण सापडले असून माहीममधील एकूण रुग्ण 10,106 झाले आहेत.

loading image