esakal | मुंबईसाठी दिलासादायक बाब; रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईसाठी दिलासादायक बाब; रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार

sakal_logo
By
मिलिंद तांबे

रुग्णवाढीचा सरासरी दरही आला 0.6 टक्क्यांपर्यंत खाली

मुंबई: शहरातील कोरोना आता आटोक्यात येऊ लागला असून रूग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,063 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.6 % पर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97% पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 6,161 हजारांवर आला आहे. (Mumbai Coronavirus Update Patients Doubling Rate gone past thousand days)

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

मुंबईत गेल्या 24 तासांत 351 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,31,914 इतकी झाली आहे. दिवसभरात 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,07,654 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 78,11,748 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचा: "त्यात काय मोठा पराक्रम?"; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 726 इतका झाला आहे. मृत झालेल्यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 6 पुरुष तर 4 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 3 रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते, तर 6 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

loading image