esakal | Court: अनील देशमुखच्या ईडीविरोधातील याचिकेवर 4 ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

high court

अनिल देशमुखच्या ईडीविरोधातील याचिकेवर 4 ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्या ईडीविरोधातील याचिकेवर ता 4 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन सुनावणी होणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोपांमुळे गुन्हा दाखल झालेल्या देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी पाचवेळा समन्स बजावले आहे. मात्र अद्याप त्यांनी ईडिच्या अधिकार्यांसमोर हजेरी लावली नाही. माझ्यावर राजकीय आकसातून आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे ही समन्स रद्द करावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. याचिकेवर न्या सारंग कोतवाल आणि न्या माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ईडिच्या वतीने अतिरिक्त सौलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत, त्यामुळे औनलाईन सुनावणी घ्यावी अशी मागणी आज न्या एस.एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली. याला देशमुख यांच्या वकिलांनी विरोध केला आणि पुढील सुनावणी होईपर्यंत अंतरिम संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, सुनावणी घेतल्यानंतर यावर निर्णय होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

हेही वाचा: मुंबईत दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. याबाबत सीबीआयने गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ईडिने देखील आता यामध्ये तपास सुरू केला आहे. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील अन्य एक याचिका केली आहे.

loading image
go to top