

Covid Centre Scam Exposed In Mumbai During Health Crisis
Esakal
Mumbai Covid Centre Scam: पाच वर्षांपूर्वी जगात कोरोनाच्या साथीनं थैमान घातलं होतं. भारतासह जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लोक घरात बसून होते. रस्ते मोकळे होते, फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या धावत होत्या. त्या काळात मुंबईत कोविड सेंटर उभारताना अनेक नियम डावलण्यात आल्याचे आणि त्यातून भ्रष्टाचार झाल्याचं आता विविध तपास यंत्रणांच्या अहवालातून समोर आलंय. या प्रकरणी अटकेच्या कारवायासुद्धा करण्यात आल्या आहेत.