"... तर 1 जूनपर्यंत कोरोना मृत्यूदर आटोक्यात येईल" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital

'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'च्या शास्त्रज्ञांचा निष्कर्ष

"... तर 1 जूनपर्यंत कोरोना मृत्यूदर आटोक्यात येईल"

मुंबई: राज्यात सध्या लॉकडाउनची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी वेगाने वाढणारी रूग्णसंख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. पण गेल्या काही दिवसात मुंबईत रूग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याची बाब समोर येत आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'च्या शास्त्रज्ञांनी सूचवला आहे. मुंबईत जर 75 टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर 1 जूनपर्यंत कोविड मृत्यूदर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केल्यानंतर हा दिलासादायक निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. (Mumbai Covid Death Rate can be down by 1 June with 75 percent of Vaccination)

हेही वाचा: मुंबईत लसींचा तुटवडा; दिवसभरात केवळ ३ हजार जणांचे लसीकरण

मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा कालावधी हा सरासरी 111 दिवसांवर पोहोचला आहे. तर करोना वाढीचा दर 0.61 टक्क्यांवर घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालेली असली, तरी मृतांचा आकडा चढाच आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 2 हजार 662 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे 78 रुग्ण दगावले आहेत.

हेही वाचा: देशात सर्वाधिक मृत्यूदर असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे

"मुंबईमध्ये लसीकरणावर भर देणे गरजेचे असून महिन्याभरात 20 लाख नागरिकांचे लसीकरण होणं गरजेचं आहे, तरच जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. 1 जुलै किंवा त्यानंतर लवकरच शाळासुद्धा सुरु करता येऊ शकतात", असे TIFR चे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितलं. "मात्र हे पूर्वानुमान असल्यानं यामध्ये चूक होण्याचीदेखील शक्यता आहे. जुलै महिन्याच्या जवळपास या सर्वांचे अचूक मूल्यांकन करता येईल", असं जुनेजा म्हणाले.

हेही वाचा: 'मुंबई इंडियन्स'च्या जर्सीमधली नवी 'मिस्ट्री गर्ल' कोण?

सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा नवा 'डबल म्युटंट स्ट्रेन' वेगाने पसरत असून या नवीन विषाणूचा प्रसार हा दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. लोकल सुरू झाल्यानंतर त्यात अधिक भर पडली. फेब्रुवारीमध्ये मुंबई व महाराष्ट्रातील अन्य मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा नवीन विषाणू वेगाने पसरत गेला. लॉकडाऊन शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरू झाले. बाजारांत लोकांची वर्दळ वाढली, रस्त्यावर गाड्यांची गर्दी वाढत गेली, त्यामुळे कोविडच्या विषाणूचा प्रसार होत गेला. हीच परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारानुभूत ठरली असं TIFR नं म्हटले आहे. मुंबई सारखीच दुसरी लाट पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर अशा इतर जिल्ह्यांत देखील असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

(संपादन- विराज भागवत)

Web Title: Mumbai Covid Death Rate Can Be Down By 1 June With 75 Percent Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top