esakal | मुंबई : दोन महिन्यांतील कोविड मृत्यूंचा अभ्यास होणार
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

मुंबई : दोन महिन्यांतील कोविड मृत्यूंचा अभ्यास होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोविड चाचणीच्या एकूण 188 नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे 128 (68 टक्के) रुग्ण आढळले. त्यामुळे मयत झालेल्या रुग्णांना सुद्धा डेल्टा प्लस विषाणूची बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याची उकल व्हावी यासाठी मुंबईतील मागील दोन महिन्यातील मृत्यूंचा अभ्यास राज्य मृत्यू परीक्षण समिती करणार आहे.

राज्यासह मुंबईत वाढलेल्या डेल्टा प्लस विषाणूने वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लसचा मुंबईला असणारा धोका लक्षात घेऊन त्यावर विशेष अभ्यास करण्यात येत आहे. यासाठी कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) अंतर्गत कोविड बधितांच्या नामुन्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

हेही वाचा: दापोली : बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका

कोविड विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करणारी वैद्यकीय यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित झाली आहे. पहिल्या तुकडीतील एकूण 188 नमुन्यांमध्ये 128 रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाचे म्हणजे डेल्टा प्लस व्यतिरिक्त उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे 2, केपा प्रकाराचे 24 रुग्ण विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईत देखील मृत्यू झालेल्या काही रुग्णांना डेल्टा प्लसची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय यापूर्वी झालेल्या रुग्णांना देखील डेल्टा प्लसची बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जुन्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे राज्य मृत्युपरिक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

हेही वाचा: लोकलमधून पाच लाख लसवंत प्रवास करू लागले

मुंबईत एका आठवड्यात साधारणता 25 मृत्यू होतात. त्यानुसार मागिल दोन महिन्यातील सुमारे 200 मृत्यूंचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे ही डॉ. सुपे म्हणाले. या रुग्णांचे मृत्यूपूर्वी जे नमुने घेण्यात आले आहेत, त्याच्या ज्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत त्याचा अभ्यास केला जाणार आहे. शिवाय इतर नमुन्यांमधील विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येणार आहे. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होण्यास मदत होईल असे ही डॉ. सुपे म्हणाले.

loading image
go to top