

19-year-old girl gives birth premature Baby
ESakal
भाग्यश्री भुवड
मुंबई : जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात एका १९ वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात अकाली (प्री-मॅच्युअर) बाळाला जन्म दिल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. त्या तरुणीने नंतर नवजात बाळाला कचरापेटीत टाकले. या वेळी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून कर्मचाऱ्यांनी त्याचा जीव वाचवला. सध्या नवजातावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तरुणीवर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.