
Summary
पोलिसांनी जुन्या प्रकरणांची फाईल तपासताना त्यांचा ठावठिकाणा शोधला.
मतदार यादी आणि स्थानिक माहितीच्या आधारे त्यांना रत्नागिरीतील दापोलीत सापडले.
पोलिसांनी त्यांना अटक करून मुंबईत आणले आणि ओळख पटवून कायदेशीर कारवाई सुरू केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका गावातून ७१ वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ४८ वर्षापूर्वी केलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपी अनेक वर्षे एकांतवासात राहात होता.याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,चंद्रशेखर कालेकर यांच्यावर १९७७ मध्ये मुंबईच्या लालबाग परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु कायदेशीर नोटिसांना उत्तर न देता ते अचानक गायब झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये वेगवेगळ्या नावांनी राहून अटक टाळण्याचा प्रयत्न केला.