Mumbai News: भरदिवसा दोन अज्ञात व्यक्तींनी बंदूक, चाकूचा धाक दाखवत सात रस्ता परिसरातील सराफा दुकान लुटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी तब्बल १.९३ कोटींचे सोने, चांदीचे दागिने लुटून पोबारा केला. अलीकडच्या काळात शहरात दिवसाढवळ्या झालेली ही सर्वात मोठी लूट असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला असून, गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आहे. या लुटीची माहिती मिळताच खुद्द सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी,