
Mumbai Mahapalika Election 2025: सरते वर्ष मुंबईसाठी निवडणुकांचे वर्ष ठरले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांनी वेगळे कौल दिले, मात्र राज्याप्रमाणे विरोधकांना पूर्णपणे झिडकारले नाही, हे विशेष. नव्या वर्षात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून, त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या दोन्ही निवडणुकांपेक्षा पालिका निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, अशी परिस्थिती आहे.
२०२४ मध्ये सहा महिन्यांच्या टप्प्यात मुंबईकरांनी दोनदा बोटाला शाई लावली. मार्चमध्ये लोकसभा तर सप्टेंबरमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. लोकसभेसाठी राज्यात पाच टप्प्यात मतदान झाले.
यामध्ये मुंबईचा क्रमांक शेवटचा लागला. त्यामुळे मुंबईत शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने निवडणुकांचा माहौल दिसला नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी लढत झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली.