आंबिवलीच्या कुप्रसिद्ध इराणी टोळीतील दोघांना पोलिसांकडून बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आंबिवलीच्या कुप्रसिद्ध इराणी टोळीतील 2 सदस्य ना म जोशी मार्ग पोलिसांनी नेरळमधून अटक केली आहे.

Mumbai Crime : आंबिवलीच्या कुप्रसिद्ध इराणी टोळीतील दोघांना पोलिसांकडून बेड्या

मुंबई - आंबिवलीच्या कुप्रसिद्ध इराणी टोळीतील 2 सदस्य ना म जोशी मार्ग पोलिसांनी नेरळमधून अटक केली आहे. अमजद शहापूर इराणी उर्फ चित्तू आणि टाकी इराणी अशी अटक आरोपींची नावे असून दोघे ही कुप्रसिद्ध इराणी टोळीचे सदस्य आहेत. या आरोपिवर 25 हून अधिक पोलीस ठाण्यात लुटमार चोरी फसवणूक अशा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

या प्रकरणात पिडीत महिला शरयू शरद वाडेकर 15 फेब्रुवारी रोजी दुपारी लोअर परळ येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एटीएम मधून आलेल्या काही नोटा फाटलेल्या असल्याचे शरयू वाडेकर याना समजले. त्या एटीएम बाहेर येताच तेथे अगोदरच उपस्थित आरोपींनी संगणमत करून एटीएम मधून आलेले नोटा या फाटक्या नोटा बदलून द्यायचे आश्वासन दिले. नोटा बदलून घेण्यासाठी मोजून देण्याच्या उद्देशाने पैसे हात चलाकीने काढून आरोपींनी पळ काढला. शरयू वाडेकर यांनी त्वरित ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. तातडीने ना म जोशी मार्ग पोलीसानी तपास सुरू केला.

ना म जोशी मार्ग पोलीसानी घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज तपासले असता यातील आरोपी हा अमजद इराणी व टाकी इराणी असल्याबाबत माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसाना मिळाली. आरोपी हे आंबिवली परिसरातील असल्याने त्यांचा आंबिवली परिसरात शोध घेण्यात आला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी नेरळ परिसरात असल्याबाबत माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने स्थानिक पोलीस मदत घेऊन आरोपींना नेरळ येथील इराणी पाड्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.