भारतीय लष्करावर वादग्रस्त ट्रिक नंतर अभिनेत्री विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress richa chadda

अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

Crime News : भारतीय लष्करावर वादग्रस्त ट्रिक नंतर अभिनेत्री विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई - अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेत्री रिचा चढ्ढा विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी गलवान खोऱ्यात चिनी सैन्या विरोधात भारतीय लष्कराच्या झालेल्या केलेल्या हिंसक झडपिमुळे बलिदान दिलेल्या जवानांची प्रकारे खिल्ली उडवली असल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे मन दुखावले असून कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी जुहू पोलीस ठाण्यात, 24 नोव्हेंबर गुरूवारी तक्रार दाखल केली आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अभिनेत्री ऋचाने भारतीय लष्कराचा, विशेषत: गलवान खोऱ्यात देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांचा अपमान केला आहे आणि त्यांची खिल्ली उडवली आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून या प्रकरणी कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करण्यात यावा. रिचा चड्ढाने तिच्या वक्तव्याबद्दल आधीच माफी मागितली आहे.

अभिनेत्री रिचा चड्ढा ने नुकतंच केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं केला आहे, असा आरोप तिच्यावर करण्यात येत आहेत. उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, 'पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत,' असे द्विवेदी म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर 'गलवान हाय म्हणत आहे', असे ट्विट केले.

'अशोक पंडित यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'ऋचा चड्ढाने गलवानवरील वक्तव्याद्वारे भारतीय लष्कराची केवळ खिल्ली उडवली नाही, तर शहीद जवानांच्या कुटुंबियांचाही अपमान केला आहे.' 'हे देशद्रोहाचे कृत्य आहे. भारत आणि सुरक्षा दलांविरुद्ध कट रचल्याबद्दल ऋचा चड्ढाविरुद्ध एफआयआर दाखल व्हायला हवा. तसेच ऋचासोबत इतर कोणकोणत्या राष्ट्रविरोधी शक्ती आहेत याचाही तपास व्हायला हवा'.

- अशोक पंडित (चित्रपट निर्माता)