Model Attack in Lokhandwala Andheri West Mumbai
esakal
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय तरुणाने एका मॉडेलच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा (Model Attack in Lokhandwala Andheri West Mumbai) प्रयत्न केला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपी मोहम्मद शकील शेख याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.