ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कुर्ला डेपोच्या सिग्नलवर पोलीस हवालदाराना ऑन ड्युटी मारहाण करणाऱ्या आरोपीला कुर्ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai Crime : ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपी अटकेत

मुंबई - कुर्ला डेपोच्या सिग्नलवर पोलीस हवालदाराना ऑन ड्युटी मारहाण करणाऱ्या आरोपीला कुर्ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 53 वर्षीय माहीमचा रहिवासी इशाक वसईकर वसईकर सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून कॉन्स्टेबल राकेश ठाकूर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्या बदल्यात आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

11 मार्च रोजी आपले कर्तव्य बजावत आरोपीने हवालदार राकेश ठाकूर कुर्ला डेपो परिसरात वाहतूकीचे नियमन करत होते. तेव्हा आरोपी इशाक वसईकर कुर्ला परिसरात सिग्नल जवळ दुचाकीवरून येत होते. परंतु आरोपीने सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन केले. तात्काळ आरोपींला वाहन बाजुस घेण्याबाबत राकेश ठाकूर यांनी बजावले. त्यावर आरोपीने अरेरावीची व उध्दट भाषा वापरुन त्यांच्याशी वाद केला. तसेच आरोपीने आरडाओरडा करत लोकांना जमावले. एवढंच नव्हे अंगावर धावून धक्का बुक्की करत पोलीस कर्मचाऱ्याला गालावर चापट मारून पळून गेला.

शासकीय कर्मचाऱ्याचा कर्तव्यात जाणिपुर्वक अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. गुप्त वार्तादारांकडून आरोपीची ओळख आणि लोकेशन शोधून काढले. त्या प्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी संध्याकाळी आरोपींला अटक केली.