

Drugs Case
ESakal
जयेश शिरसाट
मुंबई : गेल्या पाच महिन्यांत परदेशात दडून भारतात अगदी सहजरीत्या अत्यंत घातक अशा रासायनिक अमली पदार्थांच्या उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या गुन्ह्यांत सहभागी चौघांना मुंबई गुन्हे शाखा, अमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. या विशेष रणनीतीमुळे परदेशातील म्होरके, प्रमुख साथीदार आणि त्यांच्या भारतातील संघटित टोळ्यांना पळता भुई थोडी झाल्याचे चित्र आहे.