मुंबई : अमली पदार्थ तस्करी, विक्रीत सक्रीय असलेल्या टोळीविरोधात 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) पहिली कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने केली. या कारवाईत टोळीप्रमुखासह त्याच्या दोन साथीदारांविरोधातील गुन्ह्यात मोक्कानुसार कलमे जोडण्यात आली.