Mumbai crime : दीड महिन्याच्या मुलीला विकणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांकडून बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai crime : दीड महिन्याच्या मुलीला विकणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांकडून बेड्या

मुंबई : आपल्या दीड महिन्याच्या मुलीला तीन लाख रुपयांना विकल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुरुवारी एका 25 वर्षीय तरुणाला गुरूवारी 3 नोव्हेंबर रोजी अटक केली. दिवाळी दरम्यान दक्षिण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजजवळील फुटपाथवरून अपहरण झालेल्या 71 दिवसांच्या बाळाच्या अपहरणाच्या प्रकरणात पोलीस तपास करताना या आरोपी तरुणाच्या प्रकरणातील माहिती समोर आली. त्याप्रमाणे कारवाई करत आरोपी पिता टिंकू चव्हाणला पोलिसांनी अटक आहे.आझाद मैदान पोलिसांना संशय आहे की आरोपी वडिलांनी आधीच दोन मुली असताना तिसरे आपत्य देखील मुलगी झाल्याने त्यांनी तिला विकण्याचा विचार केला.

प्रकरणाचे धागेदोरे

आझाद मैदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट झेवियर्स कॉलेजच्या फुटपाथवरून अपहरण झालेल्या बाळाच्या तपासादरम्यान पोलिसांनी वडाळा येथून एका जोडप्याला अटक केली होती. तसेच धारावी येथील संतोष धुमाळे या आरोपीला अटक केली. आरोपी संतोष धुमाळेने मुलाचे अपहरण करण्यासाठी वडाळातील दाम्पत्याला साठ हजार रुपये दिल्याचा आरोप आहे. आरोपी या टींकू चव्हाण ने संतोष धुमाळे मार्फत आपल्या लहान मुलीला विकल्याचा आरोप आहे.

आरोपी वॉर्डबोय

चौकशी करत असताना पोलिसांना कळले की आरोपी धुमाळे, हा सायन रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहे. आरोपी मुले विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी होता.अटकेनंतर त्याचा जबाब नोंदवताना पोलिसांना कळले की, त्याचप्रमाणे आरोपी संतोष धुमाळेने एक बाळ अशाच पद्धतीने दीड महिन्याच्या मुलीचे मानखुर्द येथील रहिवाश्यामार्फत अपहरण केलं होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मानखुर्द येथील रहिवासी आरोपी भीमशाप्पा याला शनिवार 29 ऑक्टोबर रोजी करण्यात अटक आली. आरोपी धुमाळे यांचाही अशा किती अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे , याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.