Mumbai Crime : मदिरेच्या नशेत विमानात धुडगूस घालणारे पोलिसांच्या ताब्यात

मुंबईच्या सहार पोलिसांनी दुबईहून मुंबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांना मदिरेच्या नशेत फ्लाइटमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी अटक केली.
police custody
police custodysakal
Summary

मुंबईच्या सहार पोलिसांनी दुबईहून मुंबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांना मदिरेच्या नशेत फ्लाइटमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी अटक केली.

मुंबई - मुंबईच्या सहार पोलिसांनी दुबईहून मुंबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांना मदिरेच्या नशेत फ्लाइटमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी अटक केली आहे. इंडिगोकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

बुधवारी 22 मार्चला दुबईहून मुंबईला जाणार्‍या इंडिगो फ्लाइट 6E 1088 मधून प्रवास करणारे दोन प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. क्रू मेंबर्सने अनेकदा प्रवाशांना वर्तणुकी संदर्भात इशारा दिला. इशाऱ्यांना न जुमानता त्यांनी विमानात मद्यपान सुरू ठेवले. एवढेच नाही त्यांनी क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांना शाब्दिक शिवीगाळ सुद्धा केली.

police custody
NIA Raid : एनआयएची मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ‘गझवा-ए-हिंद’ दहशतवादी मॉड्यूलवर छापेमारी

प्रोटोकॉलनुसार, बेशिस्त वर्तनासाठी त्यांना सीआयएसएफ सुरक्षा कर्मचार्‍यांकडे सोपवण्यात आले. या घटनेनंतर नजीकच्या पोलीस सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल इंडिगो कंपनीने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com