
Crime latest news: खंडणी, मनी लॉन्ड्रिंगच्या दाखल गुन्ह्यात ईडीच्या पथकाने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची ठाण्यातील सदनिका पुन्हा ताब्यात घेतली आहे. या सदनिकेची किंमत ७५ लाखांच्या आसपास असून, मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेत इक्बाल कासकरवर गुन्हा दाखल होता. सध्या इक्बाल कासकर विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत आहे.