मुंबई
Mumbai Crime : जे.जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरने अटल सेतूवरुन मारली उडी, कारमध्ये मोबाईल ठेवला अन्..., का घेतला जीवन संपविण्याचा निर्णय?
Mumbai Crime : कार आणि एक आयफोन मिळाला. मोबाईलमुळे त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. ओंकार भागवत कवितके (वय ३२) असे या उडी टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव असून पेशाने डॉक्टर असून जे.जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते कळंबोली येथे राहतात.
मुंबईतील अटल सेतू पुलावरून सोमवारी रात्री एका डॉक्टरने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारताना बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पुलावर कार आणि मोबाईल मिळाला आहे. मंगळवारी दुपारपर्यंत डॉक्टरांचा शोध लागला नाही.