मोबाईल चोरांचा प्रतिकार करताना मुंबईत वृद्धाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery crime

मोबाईल चोरांचा प्रतिकार करताना मुंबईत वृद्धाचा मृत्यू

मुंबई : मलाडमध्ये मोबाईल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरांसोबत लढताना एका ६१ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून गृहस्थाचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न ते करत होते. ही आठवड्यातील दुसरी घटना असून माहिम रेल्वे स्टेशनवर मोबाईलचोरांचा पाठलाग करताना एक ४९ वर्षीय महिला रेल्वेतून पडून जबर जखमी झाली होती. त्यानंतर पाच दिवसांच्या उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

या घटनेमध्ये मृत्यू झालेले मुकेश बाडिया हे एका खासगी कंपनीमधून निवृत्ती घेतलेले गृहस्थ होते. ते रात्री साधारण साडेनऊच्या दरम्यान शेजारच्या दुकानातून सामान घेऊन घरी येत असताना तीन चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मलाड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून शरिक अन्सारी (२६) असं त्या आरोपीचं नाव आहे. तसेच दोन आरोपी फरार असून चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला शरिक हा मार्चमध्ये कोठडीतून बाहेर आला होता असं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: इस्त्राइलकडून Iron Beam लेझर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; पाहा व्हिडीओ

"अन्सारी आणि त्याच्या साथीदाराने बाडिया यांच्यावर हल्ला करत त्यांचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, बाडिया यांनी चोरट्यांना विरोध केला पण चोरटे मोबाईल चोरण्यात यशस्वी झाले आणि या हल्ल्यात बाडिया यांचा मृत्यू झाला." असं बाडिया यांचे शेजारी विजय देवेंद्र यांनी सांगितले. "सदर घटना ही निर्जनस्थळी घडली असून ते काही वस्तू घेऊन येत असताना त्यांच्यावर चोरट्यांनी हल्ला केला. हल्ल्यात बाडिया हे जमीनीवर पडले आणि त्यांचे डोके जमिनीवर आपटल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिघांपैकी एक चोरट्याला पकडण्यात स्थानिकांना यश मिळाले." असं मलाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी सांगितलं.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं चालू केलं असून घटनास्थळी असलेल्या देवेंद्र यांनी सांगितलं की, बाडिया यांनी चोरट्यांविरुद्ध लढायचा प्रयत्न केला पण ते तिघे असल्याने त्यांनी बाडिया यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ढकलून दिले. त्यानंतर त्यांच्या डोक्याला लागले. या घटनेनंतर लगेच स्थानिक मदतीसाठी धावले असता त्यांनी अन्सारी याला पकडले आणि बाडिया यांचा मोबाईल रस्त्याच्या कडेला पडलेला स्थानिकांना मिळाला." असं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: आधी मुलाला अन् बायकोला मारले, मग लावला गळफास; कुटुंब उध्वस्त

अन्सारी आणि पलायन केलेल्या दोन चोरट्यांवर IPC सेक्शन ३४, ३०४ आणि ३९४ अंतर्गत दोन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Mumbai Crime Mobile Thief Old Man Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrimethief
go to top