Mumbai Crime : आईचा मृत्यू नैसर्गिक; लालबाग हत्या प्रकरण आरोपी रिंपलचा दावा

आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन घरात अनेक ठिकाणी लपवणाऱ्या रिंपल जैन या मुलीची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.
Crime news
Crime newsesakal
Summary

आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन घरात अनेक ठिकाणी लपवणाऱ्या रिंपल जैन या मुलीची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

मुंबई - आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन घरात अनेक ठिकाणी लपवणाऱ्या रिंपल जैन या मुलीची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येत आहेत. आरोपी मुलगी रिंपल जैनने आईचा मृत्यू नैसर्गिक असून तिच्यावर आईच्या हत्येचा संशय येऊ नये यासाठी मृतदेहाचे तुकडे केल्याचे पोलीस तपासत सांगितले आहे. लालबाग मधील इब्राहिम कासीम चाळीत घडलेला गुन्हा मंगळवारी 14 मार्चला उघडकीस आला. या प्रकरणात काळाचौकी पोलीस तपास करत आहेत.

आईचा मृत्यू नैसर्गिक

आरोपी रिंपल जैनच्या वडिलांचं 2000 साली निधन झाले होते. तेव्हा रिंपल तिच्या आईसह विरारमध्ये राहत होती. वडिलांच्या निधनानंतर मामा सुरेश पोरवाल यांनी दोघींना लालबागमध्ये वास्तव्यास आणले. बरेच काळ दोघी मामाच्या घरात राहत होत्या. याच घरात रिंपलनं आई वीणा यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तर आईचा मृत्यू नैसर्गिक होता. मात्र तिच्या मृत्यूला मलाच जबाबदार ठरवण्यात येईल, या भीतीनं मी तिचे तुकडे केले, असं रिंपलनं पोलिसांना सांगितलं आहे.

Crime news
Governor Ramesh Bais : भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रयत्न करा - राज्यपाल रमेश बैस

रिंपलच्या मामांचे दावे

रिंपलचे मामा सुरेश पोरवाल यांचा जवाब पोलिसांनी या प्रकरणी नोंदवला आहे. त्याप्रमाणे सुरेश पोरवाल 14 मार्चला रिंपल च्या भेटीसाठी गेले होते. मात्र रिंपलनं त्यांना घरात घेतलं नाही. त्यावेळी रिंपलनं आई झोपली असल्याचं सांगितलं. पोरवाल यांनी तिला दार उघड सांगितलं. बहिणीला भेटायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रिंपलनं आई काही दिवसांपूर्वी जिन्यावरून कोसळल्याचं, तिला अर्धांगवायूचा झटका आल्याचं सांगितलं. आई घरी नाही. ती उपचारांसाठी कानपूरला गेली असल्याचं रिंपल म्हणाली. ती खोटं बोलत असल्याचा संशय आल्यानं पोरवाल काळाचौकी पोलीस ठाण्यात गेलो आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला, असा घटनाक्रम पोरवाल यांनी सांगितला.

Crime news
Mumbai Crime : बायकोचे अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी पतीकडून शेजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न

गुन्ह्यात मदतीचा संशय

पोरवाल यांनी आपल्या जबाबात रिंपल स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे वीणाची हत्या करताना आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना तिला कोणीतरी मदत केली असावी, असा संशय पोरवाल यांनी व्यक्त केला आहे. वीणा यांचा मृत्यू 27 डिसेंबरला झाला असण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी त्या चाळीतील रहिवाशांना शेवटच्या दिसल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com