

Mumbai Crime
ESakal
अंधेरी : लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. भास्कर औरक्या स्वामी शेट्टी, कावेरी वेलमुर्गन वेदमा निकम, नाझिया गौस शेख ऊर्फ नवाज आणि माही तबरेज खान अशी या आरोपींची नावे असून, हे सर्वजण तृतीयपंथी आहेत. बोरिवली न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.