Mumbai News : बेकायदेशीरपणे प्रवास करणारा बांगलादेशी मुंबई विमानतळावर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai crime news Bangladeshi traveling illegally arrested at Mumbai airport

Mumbai News : बेकायदेशीरपणे प्रवास करणारा बांगलादेशी मुंबई विमानतळावर अटकेत

मुंबई : मुंबई विमानतळ प्राधिकरणाने एका बांगलादेशीविरुद्ध भारतात बेकायदेशीर प्रवेश आणि बेकायदेशीर भारतीय पासपोर्ट बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली आहे. बांगलादेशातील रुईफ्रा ट्रैरी मोग असे आरोपीचे नाव असून आरोपीला मुंबईहून शारजाहला जाण्याचा प्रयत्नात असताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले.

शुक्रवारी एक व्यक्ती शारजाहला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. त्याने आपला भारतीय पासपोर्ट आणि शारजाहचा व्हिसा इमिग्रेशन काउंटरवर पडताळणीसाठी सादर केला. इमिग्रेशन अधिकाऱ्याने शारजाहला जाण्याचे कारण विचारले असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.

तसेच प्रवाशाची भाषा बांगलादेशी असल्याचे दिसून आले. त्याचे आईवडील बांगलादेशात आहेत आणि त्यांच्याकडे इतर कोणतीही कागदपत्रे नसल्याचा दावा करत प्रवाशाने खोटी माहिती दिली. सुरक्षा कर्मचाऱ्याना संशय आल्याने त्यांनी त्याला पुढील तपासासाठी अधिकाऱ्याच्या ताब्यात दिले.

पुढील चौकशीत आरोपी प्रवाशी खरोखरच बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. तसेच त्याचे पालक भारतात राहत असल्याचे उघड झाले. 2011 मध्ये पालकांनी त्याला बेकायदेशीरपणे भारतात आणले होते.

तेव्हापासून तो त्रिपुरातील नातेवाईकांकडे राहत होता, जिथे त्याने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.2023 मध्ये आरोपीने त्रिपुरातून रुईफ्रुई मोग नावाने भारतीय पासपोर्ट मिळवला. तथापि, शारजाहला जाण्याचा त्याचा प्रयत्न विमानतळ प्राधिकरणाने हाणून पाडत त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.